टीम इंडियाला मिळणार पत्‍नी आणि गर्लफ्रेंडची सोबत

विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्‍या एका प्रकरणावर निर्णय देत बीसीसीआयने टीम इंडियाला गुड न्यूज दिली आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार भारतीय खेळाडू आता आपल्‍या पत्‍नीला आणि गर्लफ्रेंडला सोबत घेवून जावू शकणार आहेत.  गेल्या वर्षभरापासून भारतीय संघ व्यवस्थापन, बीसीसीआयकडे परदेश दौऱ्यात पत्नी आणि गर्लफ्रेंडला सोबत नेण्याची परवानगी मागत होते.

भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असताना, खेळाडूंची पत्नी आणि गर्लफ्रेंड सोबत असण्यावरुन गेल्‍या काही दिवसांपासून वाद सुरु होता. अखेर गुरुवारी बीसीसीआयने आपल्‍या नियमात बदल केला आहे. परंतु, या निर्णयासोबतच बीसीसीआयने यावेळी खेळाडूंसाठी काही नियमही घालून दिले होते. नव्या नियमानुसार खेळाडूंना आपली पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवण्यासाठी ठराविक वेळ देण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, विश्वचषकातील पहिल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडना सोबत राहण्याची परवानगी असणार आहे. विश्वचषकातील पहिला सामना ५ जून रोजी भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर खेळाडू आपल्या पत्नीला सोबत आणू शकणार आ

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या