माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या

नवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन लंडनमध्ये पसार झालेल्या मल्ल्याने किंगफिशरच्या माध्यमातून कर्जाची रक्‍कम परत देण्याची सशर्त तयारी दाखवली आहे

विजय मल्ल्याने अनेक ट्विट केले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘आपण किंगफिशरला वाचवण्यासाठी केलेली गुंतवणूक आणि प्रयत्न याकडे दुर्लक्ष करत विनाकारण टीका करण्यात आली. एनडीए सरकार दुटप्पी वागत आहे. मी, कंपनी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी किंगफिशर एअरलाइन्समध्ये 4000 कोटींची गुंतवणूक केली. मात्र, त्याची अजिबात दखल न घेता शक्य माझ्यावर टीकाच करण्यात आली. याच सरकारी बँकांनी भारतातील सर्वोत्कृष्ट असलेल्यांपैकी एका कंपनीला बुडू दिले. भाजप सरकारने किंगफिशरला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल वारंवार मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका केली. पण आता त्यांनीही नरेश गोयल यांच्या जेट एअरवेजसाठी तेच केले आहे. विजय मल्ल्याने सरकारी बँकांना आपली ऑफर मान्य करत जेट एअरवेजला वाचवा असं सांगितले आहे.’

‘किंगफिशरला मोठे नुकसान झाल्याने 2012 मध्ये बंद पडली. दिवाळखोरीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, करोडो रुपयांचे नुकसान झालं होते. मी, पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, कर्ज फेडण्यासाठी माझ्या संपत्तीची माहिती मी कर्नाटक उच्च न्यायालयात दिली आहे. मग बँका माझे पैसे घेत का नाहीत. हेच पैसे वापरुन ते जेट एअरवेजला वाचवू शकतात,’ असेही मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटले आहे

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या