मुंबई शेअर बाजाराची उसळी

मुंबई शेअर बाजाराची तेजीने सुरुवात झाली आहे. बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतली. पहिल्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 175 अंकाची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 30 अंकाची वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने या आठवड्याच्या सुरुवातीला 39 हजाराचा विक्रमी टप्पा गाठल्यानंतर मंगळवारीही बाजारात तेजी होती.

आजही बाजारात तेजीचे वातावरण असून पहिल्या सत्रात बाजाराने उसळी घेत 175 अकांची वाढ नोंदवली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक संकेत मिळत असल्याने बाजारात तेजीचे वातावरण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. बाजारात तेजी कायम राहिल्यास आगामी काळात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 40 हजाराचा टप्पा पार करेल असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या