संतोष जुवेकर झळकणार इंटरनॅशनल चित्रपटात

आपल्या कसदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी आणि छोटा पडदा गाजवल्यानंतर आता अभिनेता संतोष जुवेकर आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात संतोष ‘डिसोनन्स’ या जर्मन या जर्मन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून तो आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे .

या चित्रपटासाठी तो जर्मन भाषादेखील शिकतोय. तसंच, या भूमिकेसाठी गेले काही महिने तो फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत आहे. सैन्यातील अधिकाऱ्यांच्या वागण्या-बोलण्याच्या पध्दतींचाही बारकाईने अभ्यास त्यानं केला आहे

आर्मीत जवानांना शारीरिक शिक्षणासोबतच मानसिक शिक्षणही दिले जाते. त्यांच्या मेन्टल फिटनेसची परीक्षा घेताना त्यांच्यासोबत अनेक माइंड गेमही खेळले जातात. त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मेन्टली थर्ड डिग्री ट्रेनिंग देण्यात येते. ह्यावरच हा सिनेमा आधारित आहे

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या