म्हणे IPL मुळं धोका, पाकच्या उलट्या बोंबा, पाकिस्तान ने केले IPL चे प्रक्षेपण बंद

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अजब दावा करत, कॅबिनेटमध्ये आयपीएलचा प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इमरान खान यांनी, आयपीएमुळं पाकिस्तानातल्या क्रिकेटला धोका निर्माण होत आहे, असा अजब युक्तीवाद केला आहे. यासंबंधी पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी माहिती दिली आहे.

चौधरी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आयपीएलच्या माध्यमातून भारत सरकार पाकिस्तानातील क्रिकेटला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत, लीग पाकिस्तानात दाखवण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगितले. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) प्रक्षेपण बंद केले होते, त्याचा वचपा काढण्यासाठी पाकिस्ताननं हा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान भारतानं पीएलएलचं प्रक्षेपण बंद केल्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाच त्याचा फटका बसला होता. यावेळी भारतानं घेतलेल्या या निर्णयाविरोधात चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं या नाराजीतूनच पाकिस्ताननं हा निर्णय घेतला असावा. तसेच क्रिकेट आणि राजकारण हे वेगवेगळे ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो, असा दावाही त्यांनी केला. या संदर्भात आता इमरान यांनी अखेरचा निर्णय घेत, पाकिस्तानात आयपीएलवर बंदी घातली आहे. मात्र 29/11च्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबत वैयक्तिक क्रिकेट मॅच खेळण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या खेळाडूंनाही आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी आहे.म्हणूनच पाक सरकार हा राग काढत असल्याचे मत सोशल मिडीयावर व्यक्त केले जात आहे. 

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या