‘एनडीए’ला २७५ जागांचा अंदाज

देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल. एनडीएला २७५ जागा मिळतील, यूपीएला १४७ जागा मिळतील तर अन्य पक्ष १२१ जागांपर्यंत मजल मारतील, असा अंदाज इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. 

सर्वेक्षणातून लोकसभेच्या ५४३ जागांचा वेध घेण्यात आला असून भाजपला २३० जागा मिळू शकतात तर काँग्रेस ९७ जागांपर्यंत मजल मारेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसला २८, बीजू जनता दलाला १४, शिवेसनेला १३, समाजवादी पक्षाला १५, बसपाला १४, राजदला ८, जदयुला ९ जागा मिळतील, असे हे सर्वेक्षण सांगते.

महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी सर्वाधिक २१ जागा भाजपला मिळण्याची शक्यता असून शिवसेना-भाजप युती ३४ जागांचा टप्पा गाठेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १३ जागा मिळतील व एक जागा अन्य पक्षाच्या खात्यात जाईल, असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. 

उत्तर प्रदेशात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात ८० जागा असून भाजप- ४५, बसपा- १४, सपा- १५, काँग्रेस- ४ असे चित्र निकालातून पुढे येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या