नरेंद्र मोदी सर्वात मोठे ब्लॅकमेलर – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असून पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा सर्वात मोठे ब्लॅकमेलर असा उल्लेख केला आहे. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यासाठी भाजपाने त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यासोबतच काँग्रेसने कोणासोबत आघाडी करु नये यासाठी भाजपानेच खोडा घातल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॅकमेलर असून सोनिया गांधींसह अनेकांना ब्लॅकमेल करत असतात असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तुमच्या जावयाला जेलमध्ये जायचं नसेल तर तुम्ही कोणासोबतही आघाडी करु नका अशी अट नरेंद्र मोदींनी काँग्रेससमोर ठेवली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्ष तयार असतानाही आघाडी झाली नसल्याचा आरोप केला. तसंच शीला दीक्षित यांचे पुण्यातील एका भ्रष्टाचारी नेत्याशी संबंध असल्याचा आऱोपही त्यांनी यावेळी केला.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या