‘कलंक’ या चित्रपटाचे टायटल सॉन्ग रिलीज (video)

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरून धवल ‘कलंक’ या चित्रपटामधील पहिला लूक व्हायरल झाल्यानंतर आता या चित्रपटातील टायटल सॉन्ग रिलीज झाले आहे. कलंक’ या चित्रपटाचे टायटल निर्माते करण जोहर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे

या टायटलमधील गाण्याचे बोल ‘कलंक नहीं इश्क है काजल पिया’ हे आहेत. या टायटलमध्ये आलिया आणि वरुण यांची केमिस्ट्री दिसून येत आहे. त्याचसोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांचे बॉन्डिंग ही दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट १७ एप्रिल २०१९ ला रिलीज होणार आहे. 

‘कलंक’ या चित्रपटाचे हे गाणे अरिजीत सिंह आणि शिल्पा राव यांनी गायिले आहे. तसेच गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांचे असून म्यूझिक प्रीतम यांनी दिले आहे. चाहत्यांना हे गाणे आवडल्याने रिस्पॉन्स ही चांगला मिळाला आहे. काही चाहत्यांनी या गाण्यावर कॉमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावरील एका युजर्सनी लिहिले आहे की, “सॉन्ग ऑफ द ईयर, मनाला भिडले. लव यू अरिजीत सिंह.”

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या