मुंख्यमंत्री कमलनाथ यांच्या सचिवाच्या घरावर आयकरचा छापा

इंदौर : आयकर विभागाकडून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सचिव प्रविण कक्‍कड यांच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. शनिवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आयकरच्या १५ हून अधिक अधिकार्‍यांच्या टीमने त्‍यांच्या निवासावर छापा मारला. यासोबतच विजय नगर येथील शोरूमसह अन्य ठिकाणांचीही तपासणी सुरू आहे .

रात्री उशिरा जेंव्हा आयकर विभागाच्या टीमने कक्‍कड यांच्या घरी छापेमारी केली तेंव्हा सुरूवातीला घरातील सदस्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण होते, मात्र आयकर विभागाचे अधिकारी असल्‍याचे समजल्‍यावर घरातल्‍या लोकांनी तपासकार्यात सहकार्य केले. 

माजी पोलिस अधिकारी प्रविण कक्‍कड यांना सेवेत असताना  राष्‍ट्रपती पुरस्‍काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर त्‍यांनी २००४ मध्ये ही नोकरी सोडली. यानंतर काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय मंत्री कांतिलाल भूरिया यांचे ते सचिव बनले. नंतर २०१८ मध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ते सचिव बनले. 

.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या