भाजप नेते खरे देशभक्त असते तर त्यांनी इंदिरा,राजीव गांधी यांचा आदर केला असता: प्रियांका गांधी

फतेहपुर: निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरदार वाहू लागले आहे. निवडणूकीच्या आखाड्यात आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध चांगलेच रंगलेले पाहायला मिळत आहे. यातच आता देशभक्तीचा मुद्दा उफाळून आला आहे. प्रियांका गांधी वधेरा यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत भाजपमधील नेते खरे देशभक्त असते तर त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा आदर केला असता असे वक्तव्य केले आहे.

फतेहपुर येथे घेण्यात आलेल्या कोपरा सभेत प्रियांका गांधी बोलत असताना म्हणाल्या, देशभक्तीच्या मोठ्या बाता मारणारे भाजपमधील नेते खरे देशभक्त असते तर, त्यांनी शहीद जवनांचा आदर केला असता मग ते शहीद हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा त्यांचे विरोधातील राजकीय पिता. ते शहीद आहेत. कोणत्या शहीदांचा आदर करायला हवा हे आपण निवडू शकत नाही. जर तुम्ही खरे देशभक्त असाल तर राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यासह सर्व शहीदांचा आदर करा. 

भाजप जर देशभक्त असेल तर, ज्यावेळी शेतकरी आपली समस्या घेऊन दिल्लीला जातील त्यावेळी दरवाजे बंद करणार नाहीत. तसेच रोजगार देण्याचे आश्वासनदेखील पुर्ण करतील. असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

भाजप प्रत्येक निवडणूकीमध्ये देशभक्तीचा मुद्दा मांडते. पण विकासासंदर्भात मुद्दा मांडत नाही असा आरोपदेखील प्रियांका यांनी केला. दिलेली आश्वासने पूर्ण करणाऱ्यांनाच तुमचे बहुमोल मत द्या. असे प्रियांका गांधी यांनी सभेत जनतेला आवाहन केले. 

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या