नीरव मोदीच्या जामिनावर आज लंडनमध्ये फैसला

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीबाबत आज लंडनच्या वेस्टमिस्टर कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यासाठी ईडी आणि सीबीआयची संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. नीरव मोदीची लीगल टीम त्याच्या जामिनासाठी कोर्टात आपली बाजू मांडणार आहे. तर दुसरीकडे ईडी आणि सीबीआय त्याला जामीन मिळू नये तसेच भारताकडे सोपवण्यात यावे यासाठी आपली बाजू मांडणार आहेत. लंडनच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार आज सकाळी ११ वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

नीरव मोदीला २० मार्च रोजी लंडनमध्ये अटक झाली त्यानंतर जिल्हा न्यायाधीश मेरी मैलन यांनी पहिल्याच सुनावणीत त्याला जामीन देण्यास नकार दिला होता. नीरव मोदी एका बँकेत अकाऊंट खोलण्यासाठी गेलेला असताना स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी नीरव मोदीला सेन्ट्रल लंडमध्ये अटक केली होती. तेव्हापासून तो दक्षिण-पश्चिम लंडनमधील वैंड्सवर्थ तुरुंगात कैद आहे.

वेस्टमिस्टर कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एमा आर्बथनॉट यांच्या कोर्टात आज नीरव मोदीच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. याच न्यायाधीशांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मद्य सम्राट विजय मल्याला भारतात प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या