IPL: DCvsCSK: चेन्नईचा दिल्लीवर ६ गडी राखून विजय

दिल्लीः दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात चेन्नईने दिल्लीवर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने सलग दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी पटकावले असून, शेट वॉटसन सामनावीर ठरला आहे. 

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १४८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला अंबाती रायुडूच्या बाद होण्याने पहिला धक्का बसला. तो २१ धावांवर बाद झाला. सलामीवीर वॉटसनने ४ चौकार आणि ३ षटकार लगावत ४४ धावांची खेळी साकारली. अमित मिश्राने त्याला माघारी धाडले. केदार जाधव आणि सुरेश रैनाने खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरेश रैना ३० धावा काढून परतला. कर्णधार धोनीने ३२ धावा करत चेन्नईला विजयी पथावर नेले. सामना जिंकायला अवघ्या २ धावांची गरज असताना केदार जाधव बाद झाला. अखेरच्या षटकात मैदानात आलेल्या ब्रॅव्होने चौकार लगावत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या