साक्षात मृत्यूला चकवा देवून परतली बिग बॉस सीजन 5 ची विजेती

नवी दिल्ली : टिव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस सीजन ५ ची विजेती जूही परमारने आपण होळीच्या दिवशी मृत्यू जवळून पाहिला असल्याचे सांगितले आहे. ही माहिती जूहीने स्वत: सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली आहे.

या फोटोसोबत जूहीने कॅप्शनही दिली आहे की, २१ मार्चला होळीच्या दिवशी अचानक माझी तब्येत बिघडली होती. त्यावेळी मी माझी मैत्रीण आश्का गोराडिया हिच्या घरी होते. आणि तेथूनच मला दवाखान्यात नेण्यात आले. त्यावेळी माझे सर्व रिर्पोट नॉर्मल असून सुद्धा श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यावेळी मला वाटत होते की, माझा जीव गुदमरत आहे. आणि माझा जीव पुढील पाच मिनिटांत जाणार आहे. त्यावेळी मी माझ्या मैत्रिणीला सांगितले की, माझ्या मुलगी समायराची काळजी घे.  

तसेच जूहीने पुढे म्हटले की,त्यावेळी पुर्ण माझे आयुष्य डोळ्यासमोर आले होते. मला वाटले की, सगळे मला सोडून दूर जात आहेत. त्यावेळी मी देवाकडे धावा केला आणि म्हणाले, माझा जीव वाचव कारण मला माझ्या मुलगीचा साभांळ करायचा आहे. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर मुलगीचा चेहरे आणि जिवंत राहण्याची इच्छा दिसत होती. 

टिव्ही अभिनेता सचिन श्रॉफसोबत जूहीने २००९ ला लग्न केले होते.  ती बिग बॉसमध्ये २०१२ ची विजेती ठरली होती. तसेच जूही मुलगी समायरा झाल्यावर २०१८ मध्ये पतीसोबत  घटस्फोट घेतला. तेव्हापासून एकटीच समायराचा सांभाळ करत आहे.     

View this post on Instagram

Dear Life, I Am Here To Live!!!!

A post shared by Juhi Parmar (@juhiparmar14) on

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या