IPL 2019 : अश्विनने मर्यादेत राहावे, बीसीसीआयने खडसावले

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यातील सामन्यात आर. अश्विनने जोस बटलरला धाव बाद केल्या प्रकरणावरून चर्चा रंगल्या आहेत. बटरला धाव बाद करणं ही कुठली रणनिती नव्हती. खेळातील परिस्थितीनुसार सर्व प्रकार घडला, असं स्पष्टीकरण अश्विनने सामना संपल्यानंतर दिलं होतं. पण या प्रकरणी बीसीआयने अश्विनला खडसावलं आहे.

आर. अश्विनने केलेल्या प्रकारावरून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे, प्रशिक्षक पॅडी उप्टन आणि ब्रॅण्ड अॅम्बेसिडर शेन वॉर्न नाराज होते. अश्विनचा प्रकार खेळाच्या विरूद्ध आहे, रॉयल्समधील सर्वांचं म्हणणं आहे. सोशल मीडियासह क्रिकेटमधील दिग्गजांनीही या धाव बाद केल्याच्या प्रकारावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर अश्विनला ट्रोल करण्यात आलंय. #AshwinMankads हे सध्या ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे.

आर. अश्विनने केलेल्या प्रकाराची बीसीसीआयने दखल घेतलीय. कर्णधाराने खेळाच्या मर्यादांचे पालन केले पाहिजे. सामना अधिकारी या प्रकरणी जबाबदारीने वागले नाहीत, असं बीसीसीआयने म्हटलं आहे. मैदानावर एखाद्या खेळाडूला बाद करण्यासाठी फक्त क्रिकेटमधील कौशल्याचा उपयोग केला गेला पाहिजे. यामुळे प्रेक्षकांना आणि हा खेळ शिकणाऱ्यांना यातून योग्य संदेश मिळेल, असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. खेळाडूने आपल्या खेळातून इतरांना प्रभावित करायला हवे, गैरवर्तणातून करू नये. स्पर्धा करणं चांगलं आहे. पण खेळाचे नियम आणि त्याच्या मर्यादेचे पालन करणंही गरजेचं आहे, असं बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकारी म्हणाले

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या