बिग बॉस फेम जुई गडकरीनं फॅन्ससाठी गायलं खास गाणं (video)

मुंबई:  पुढचं पाऊल’ आणि ‘बिग बॉस मराठी’तून घराघरात पोहोचलेली जुई गडकरीचं अभिनेत्री म्हणून नेहमीच कौतुक होतं. परंतु, जुई उत्तम गायिकादेखील आहे हे तिच्या चाहत्यांना नुकतंच कळलंय. जुईनं इन्स्टाग्रामवर तिच्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे

‘मी जेव्हा आनंदात असते तेव्हा गाते, दु:खी असते तेव्हा गाते…ठीकठाक असते अगदी तेव्हाही गाते…त्यामुळे आज मी माझं सगळ्यात आवडतं गाणं गात आहे’ असं तिनं लिहिलं आहे. जुईच्या या गाण्याचेही तिच्या फॅन्सनी प्रचंड कौतुक केलंय आणि तिनं गात राहिलं पाहिजे असा सल्लाही दिला आहे. 

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या